Special Report On Lal chandan Yavatmal|शेतात रक्तचंदनाचं झाड,यवतमाळच्या शेतकऱ्याला कोट्यावधींचं घबाड
पैसे झाडाला लागलेत का, अशी एक म्हण आहे...पण यवतमाळच्या एका शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र ही म्हण खरी ठरलीय...होय, एका झाडामुळे हा शेतकरी आता कोट्यधीश झालाय...एक झाडामुळे झाडामुळे त्याच्या हाती पाच कोटींचं घबाड लागलंय...कसं काय? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...
घाम गाळून जमीन कसणारे शेतकरी त्यांच्या शेतात एक झाड होतं... ते कशाचं याची त्यांना माहितीही नव्हती... पण, २०१३-१४ मध्ये वर्धा-नांदेड रेल्वेच्या सर्व्हेसाठी कर्नाटकातून आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना झाडाची महती सांगितली आणि ते कोट्यधीश झाले.
..हे झाडं चक्क रक्तचंदनाचं निघालं. झाडाचं तेव्हाचं मूल्य तब्बल ४ कोटी ९७ लाख रुपये होतं. रेल्वेने ते द्यायला टाळाटाळ केली वाद कोर्टात गेला आणि नागपूर खंडपीठाने शिंदेंच्या बाजूने निकाल दिला.... मूल्यांकनाच्या मोबदल्यात शिंदे कुटुंबीयांना सुरुवातीला १ कोटी आणि नंतर ५० लाख भरण्याचं फर्मान कोर्टाने रेल्वेला काढलंय. तसंच झाडाचा पूर्ण मोबदला शिंदेंना देण्यात यावा, असेही आदेश दिलेत